Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगाव व्यवसिकांवर दंडात्मक कारवाई लोकांच्या आरोग्य चांगले व लोक सुरक्षित राहावे या हेतूने कारवाई

0
1 0
Read Time2 Minute, 1 Second

(अधिकार आमचा न्युज नेटवर्क)

चाळीसगांव रोहित शिंदे

कोरोना या विषाणूने जगाच्या पाठीवर थैमान केले आहे. कोरोना या विषाणूची साखळी रोखण्यासाठी शासनाने देशभरात लॉकडाऊन केले आहे. तरीही आपल्या शहरात काही ठिकाणी शासनाने परवानगी न दिलेली दुकाने चालू होते. तसेच काही मेडिकल दुकानांवर मेडिसिन विक्रेत्यांनीच तोंडावर मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार चाळीसगाव नगरपालिका मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी, आरोग्य सभापती सौ. सायलीताई रोशन जाधव, सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका, नगरपालिका कर्मचारी वर्ग यांच्यातर्फे दुकानदारांना शासकीय नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली होती. तरीही काही दुकानदार सूचनांचे पालन करत नव्हते. त्यामुळे नगरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली. आज दि.14 मे रोजी 22000 इतका दंड आकारण्यात आला.

तसेच ही दंडात्मक कारवाई चाळीसगाव शहरवासीयांचे आरोग्य चांगले व सुरक्षित रहावे ह्या हेतूने करण्यात आलेली आहे. तसेच शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांनी कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे.

आरोग्य सभापती सौ.सायली ताई रोशन जाधव व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते रोशन भाऊ जाधव

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: