अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)- शहरातील खासगी दवाखान्यामध्ये व पॅथॉलॉजी लॅबमध्ये वैद्यकीय चाचण्यांचे व इतर सर्व चाचण्यांचे आकारले जाणारे दलाचे फलक सक्तिने लावण्याबाबत दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन.
दौंड शहरामध्ये चालू असणाऱ्या सर्व हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय उपचाराचे रक्त तपासणी ई.सी.जी व इतर सर्व चाचण्यांचे आकारले जाणारे दर सविस्तर लावण्यात यावे,सामान्य लोकांना समजेल अशा स्थानिक मराठी भाषेमध्ये दर पत्रक लावण्यात यावे तसेच सामान्य लोकांकडून खाजगी हॉस्पिटल व लॅब चालक जास्तीचे दर आकारात असून , काही हॉस्पिटल व लॅब चालक दर पत्रक लावण्यास टाळाटाळ करतात तरी दरपत्रक लावण्या बाबत आपण सर्व हॉस्पिटलांना व सर्व लॅब चालकांना लेखी कळवावे व आपण केलेली कारवाई आम्हाला कळवावी असे पत्र दौंड काँग्रेस कमिटीतर्फे डॉ. संग्राम डांगे (उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक दौंड) यांना देण्यात आले पंधरा दिवसात जर सर्व हॉस्पिटल व लॅब ला दरपत्रक लावले नाही तर कारवाई होईपर्यंत धरणे आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला ,यावेळी प्रकाश विष्णू सोनवणे (महासचिव दौंड तालुका कॉंग्रेस कमिटी) महेश ईश्वर जगदाळे (उपाध्यक्ष दौंड शहर कमिटी( विठ्ठल दोरगे.( विधानसभा अध्यक्ष) रज्जाक भाई शेख (अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग दौंड शहर) हे उपस्थित होते