गुडशेपर्ड हायस्कुल चाळीसगाव येथे हसत खेळत आंतरराष्ट्रीय योगादिवस साजरा

1 0
Read Time2 Minute, 21 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)-आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.आज देशभरात योग दिन साजरा करण्यात येत आहे. दरम्यान राज्यातील शाळा- महाविद्यालयांमध्येही योगादिन उत्स्फूर्तपणे साजरा केला जात आहे.
याचाच एक भाग म्हणून आज रोजी दि.21 जून गुडशेपर्ड हायस्कुल चाळीसगाव येथे आंतरराष्ट्रीय योगादिवस हसत खेळत साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योगादिवस असल्याने गुडशेफर्ड येथे विध्यार्थ्यांना हसत खेळत योग शिकवत योगाचे महत्व पटवून सांगण्यात आले,शाळेत घडणाऱ्या नावीन पिढीस योगाचे महत्व व फायदे कळायला हवे योगातुन भविष्यात निरोगी अशी पिढी तयार व्हावी या हेतून आंतरराष्ट्रीय योगादिवसाचे औचित्य साधून गुड शेपर्ड शाळेचे मुख्याध्यापक श्री. डॅनियल सर यांच्या मार्गदर्शनाखाली योगदिन मोठ्या उत्साहात हसत खेळत पार पडला यावेळी क्रीडा शिक्षक श्री. गोरे सर आणि शाळेचे उपशिक्षक शेख सर यांचे सहकार्य लाभले.शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा यात उत्साहात सहभाग नोंदविला. तसेच शाळेचे उपशिक्षक असलेकर सर यांनी या दिनाचे महत्व सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: