गोदावरी हॉस्पिटलमधून फरार आरोपी चाळीसगांव पोलिसांच्या ताब्यात,सापळा रचून केली अटक

1 0
Read Time2 Minute, 5 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी) – जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना फरार झालेल्या आरोपी स चाळीसगाव डी बी च्या भूषण पाटील, सतिष राजपूत या दोघा कर्मचाऱ्यांनी दि 29 रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास अटक केली आहे.
           आरोपी शंकर रविंद्र चौधरी 24 रा शिव कॉलनी चाळीसगाव हा नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात जळगाव मध्यवर्ती कारागृहात न्यायायलीन कोठडीत असतांना त्याची प्रकृती खराब झाल्याने त्यास गोदावरी फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते दि 26 जून रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास हॉस्पिटल च्या चौथ्या माळ्यावरून खिडकीची जाळी तोडून फरार झाला होता तेव्हा पासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
हा आरोपी चाळीसगावी असल्याची गोपनीय माहिती डी बी चे पो कॉ भूषण पाटील, सतिष राजपूत यांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दि 29 जून रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास चालीसगाव महाविद्यालयाजवळील वाय पॉइंट जवळ सापळा रचून आरोपी शंकर चौधरी यास अटक केली आहे. सदर घटनेत ए एस आय अनिल अहिरे, पो कॉ शैलेश पाटील, विजय पाटील, दीपक पाटील, शरद पाटील यांनी सहकार्य केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.