Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

36 तासात मोटर सायकल चोरासह चोरीची मोटर सायकल ताब्यात ग्रामीण पोलिसांची कामगिरी

0
2 0
Read Time3 Minute, 25 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगांव(प्रतिनिधी)-दिनांक 8 जून 2021 रोजी हमीद खा मेहताब खा पठाण वय 38 राहणार भांबर वाडी कन्नड जिल्हा औरंगाबाद यांनी कन्नड घाटातून म्हसोबा मंदिरासमोरून अज्ञात चोरट्याने मोटर सायकल एम एच 20 डी एक्स 5744 चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ युवराज नाईक,पो ना नितीन आमोदकर व पो ना भुपेश वंजारी यांचे पथक तयार करून तपास सुरू केला पथकास गुप्त माहिती मिळाली की आरोपी येवला जिल्हा नाशिक येथे आहे त्या आधारावर पथकाने येवला येथे जात आरोपी नवीन रुद्र वय 19 राहणार भेरी गंगा,न पा 9 नेपाळ यास चोरीच्या मोटर सायकल सह गुन्हा दाखल झाल्याच्या 36 तासात ताब्यात घेत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणत तापसी अंमलदार पो ना शंकर जंजाळे व सहकारी सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे यांच्या ताब्यात दिले सदर गुन्ह्यात आरोपीस ताब्यात घेत अटक करून संपूर्ण तपास 2 दिवसात पूर्ण करून दि 10 जून 2021 रोजी आरोपीस न्यायालयात हजर करत दोषरोप पत्र दाखल केले

आरोप पत्र दाखल झाल्यानंतर सदर केस कामी सरकारी अभियोक्ता श्री मिलिंद येवले तसेच कोर्ट पैरवी स फौ मनोज पाटील,कोर्ट केसवॉच स फौ किशोर दाभाडे यांनी कामकाज पाहिले व मा न्यायालय 3 चे न्यायाधीश एम व्ही भागवत साहेब यांनी जल्द गतीने केस चालवत अवघ्या 3 आठवड्यात निकाल देत आरोपीस दोन महिन्याचा कारावास व 500 रु दंडाची शिक्षा ठोठावली

सदर गुन्ह्यचा तपास 48 तासात पूर्ण करून दोषारोप पत्र दाखल करण्याची कारवाई मा पोलीस अधीक्षक सो डॉ श्री प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन गोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कैलास गावडे व पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

गुन्हा दाखल होताच अवघ्या 36 तासात आरोपी सह चोरीची मोटर सायकल ताब्यात घेणाऱ्या चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: