गोपाळवाडी येथे 8 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर,रक्तदात्यांना हेल्मेट भेट गोपाळवाडी ग्रामस्थ,रोटरी क्लब, रोट्रक्ट क्लब कॉलेज दौंड यांचा संयुक्त उपक्रम…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड(प्रतिनिधी)-दि ८ जुलै रोजी गोपाळवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिबिराचे आयोजक विठ्ठल होले यांनी सांगितले आहे, गोपाळवाडी येथे सदर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, शनिवार दिनांक ८ जुलै २३ रोजी सकाळी १० वाजता दौंड उपविभागीय पोलीस अधीक्षक स्वप्निल जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे,सर्व रक्तदात्याना सुरक्षा कवच हेल्मेट तसेच एक झाड (रोप) वाटप करण्यात येणार आहे,तरी रक्तदान शिबिरात तरुणांनी पुढाकार घेऊन शरीर सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी सहभागी होण्याचे गोपाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे,या शिबिरासाठी रोटरी ब्लड बँक चे रविंद्र फडतरे,नारायण पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य मिळाले आहे,तसेच
रोटरी क्लब ऑफ दौंड
अध्यक्ष :- सविता मनोहर भोर
सेक्रेटरी:- दीपक सोनवणे
रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेज
अध्यक्ष:- प्रज्वल बांडे
सेक्रेटरी:- हेमांगी बंब
यांचे सहकार्य लाभले आहे.रक्त दात्यानी विठ्ठल होले यांच्याशी 9175043967/9881533767 या नंबरवर संपर्क साधावा.