अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी वर्धा
संतोष मेश्राम
गौळ येथे जागतिक आदिवासी दिना च्या निमित्ताने बिरसा मुंडा आदिवासी मित्र मंडळी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौळ येथील सरपंच मिलिंद खोडके उपस्थित होते.
या प्रसंगी सामाजिक दुरी चे नियमा चे पालन करण्यात आले.
पत्रकार योगेश कांबळे, पद्माकर कांबळे, मंगेश बेंडे, सुनील डोंगरे, गणेश उईके, उमेश बेंडे, गौरव बेंडे व गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन नारायण उईके, अविनाश ईरपाते यांनी केले.
मान्यवरानी आपले विचार व्यक्त केले आणि उपस्थित नागरिकांना संबोधित केले.
