ग्रामविकास विभागाचे उपसचिव व औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना निलंबित करा-गौतम कांबळे

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
शहर प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-ग्रामविकास विभागाचे उपसचिव तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांना निलंबित करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री व दौंडच्या आमदार राहुल कुल यांच्याकडे केली आहे . याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे अधिक माहिती देताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की,औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा .मीना साहेब हे मागासवर्गीय व बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी आकसाने वागत आहेत .जि. प .औरंगाबाद येथील सिल्लोड जि.प प्रशालेमधील कार्यरत सर्व शिक्षकांनी तेथील प्रभारी मुख्याध्यापक यांचे विरोधात तक्रारी दिल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता उलट तक्रारकर्ते बेकसुर असतानाही एका शिक्षकाचे निलंबन केले व इतर सर्व शिक्षकांच्या वेतनवाढी बंद करण्याचे अन्यायकारक आदेश श्रीमती जयश्री चव्हाण शिक्षणाधिकारी (प्राथ. ) यांच्या सुचनेनुसार सुनावणी घेऊन व कोणत्याही शिक्षकाचे काहीही ऐकून न घेता मा . विकास मिना साहेब , मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प . औरंगाबाद यांनी या शिक्षकांवर सूडबुद्धीने कारवाई केली आहे.कारवाई करण्यासाठी कोणतेही योग्य कारण नाही याची त्यांना वेळोवेळी माहिती दिली जातेय .त्याकडे मा .मुख्य कार्यकारी अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत व शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मानसिक पिळवणूक करत आहेत .या सर्व बाबी ग्रामविकास विभागाचे उपसचिव मा.देशमुखसाहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्या असतानाही ते कोणतीही कारवाई करत नाही .उलट मागासवर्गीयांवर अन्याय होईल अशा प्रकारची भूमिका ते बजावत आहेत .पुरोगामी महाराष्ट्रातील ही घटना मानवतेला काळिंबा फासणारी आहे .या सर्व बाबी विचारात घेऊन आपण संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी व यांना ताबडतोब निलंबित करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने केली आहे .यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष व महासचिव उपस्थित होते.