Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई आता गरज गांजा तस्कर शोधण्याची….

0
1 0
Read Time6 Minute, 54 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

शहरात कुठेही गांजा विक्री होत असल्यास नागरिकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार करावी व पोलीस प्रशासनास गांजा बंद मोहिमेत सहकार्य करावे तसेच आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

संदीप पाटील,पोलिस निरीक्षक चाळीसगाव शहर

चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात पुन्हा एकदा गांजा तस्करांनी उच्छाद मांडला असून, गांजा व्यापार जोरात सुरू झाला आहे? शहर पोलिसांनी चाळीसगाव शहरातील एकाला गांजा सह अटक करत गांजा बंद मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत कारवाई करत शहरात लपून छपून होत असलेल्या गांजा तस्करीच्या देखील लगाम लागणे आवश्यक आहे.

गांजाची लपून छपून विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम शहरात रोज होत आहे.तरुणांना व अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. १० ते ५० रुपयांपर्यंत या गांजाची विक्री सर्रास होत आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. गांजाची नशा ही पूर्वी गुन्हेगारापुरतीच मर्यादित होती; परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहे. शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.चाळीसगाव परिसरातील तरुण वयोगटांतील मुले या नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहे. सामाजिक बदल होताना गांजासारख्या नशेच्या अंमली पदार्थांची ही विक्री निश्‍चितच डोकेदुखी देणारी आणि तरुण पिढीला बरबाद करणारी आहे. शहरातील काही ठिकाणे गांजा विक्रीसाठी प्रसिद्ध असल्यासारखी स्थिती आहे. गांजा पिणारे अनेकजण शहराच्या मध्यवस्तीत बसून दररोज नशेच्या आहारी जात आहेत.
शहरात गांजाची विक्री केली जात आहे.त्यावर मा. पोलीस अधिक्षक सो. श्री एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्री रमेश चोपडे यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे तसेच मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांची परवानगी घेवुन कारवाईची सुरवात पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी केली असून गांजा विक्री करणाऱ्या आरोपी जगदीश महाजन यास सुमारे 43,900/- रुपये किमतीच्या 2 किलो 228 ग्रँम गांजासह ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुध्द दिनांक 23 जून 2023 रोजी एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांच्या आशा वाढल्या आहेत ही कारवाई झाली मात्र शहरात गांजा विरुद्ध सुरू केलेली मोहीम थांबायला नको. गांजा कुठून येतो यामागे असणारे तस्कर कोण? गांजाची विक्री करणारा मुख्य व्यापारी कोण? या बाबी आजून अस्पष्ट आहेत. पोलिसांना गांजा तस्करांचा शोध घेणे आवश्यक असून तरुण पिढीला बरबाद होण्यापूर्वी शहर पोलिसांनी गांजा व्यवसायाचे पाळे मुळे शोधून उखडून फेकण्याची गरज आहे.

खबरदारीची गरज
गांजा तस्करी करणाऱ्या, विकणाऱ्या अशा सगळ्यांनाच कायद्याचा जरब बसेल, अशा कारवाईची गरज आहे. मुलांना नशेची सवय लागते.या अमली पदार्थांमुळे तरुण वयोगटांतील मुले या चुकीच्या गोष्टीकडे वळतात. त्यांना या गोष्टी सहज किंवा मित्राच्या, मित्राच्या ओळखीच्या व्यक्तीकडून उपलब्ध होऊ लागल्या आहेत. मुलांसोबत चुकीच्या संगतीचा किंवा पिअर प्रेशरमुळे ही मुले या नशेच्या आहारी जातात. यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. या मुलांचे समुपदेशन करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे-डॉ संदीप देशमुख बापजी हॉस्पिटल चाळीसगाव

कारवाई करणारे पथक

पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच श्री विकास लाडवंजारी, महसुल नायब तहसिलदार, चाळीसगांव, सपोनि सागर ढिकले, पोहेकॉ योगेश बेलदार ,पोहेकॉ नितीश वासुदेव पाटील,मुद्देमाल कारकुन पोना सुभाष घोडेस्वार, पोना पंढरीनाथ पवार, पोना विनोद विठ्ठल भोई, पोना दिपक प्रभाकर पाटील, पोना भटु पाटील, पोकॉ राहुल सोनवणे, पोकॉ प्रविण जाधव, पोकॉ विनोद खैरनार, पोकॉ निलेश पाटील, पोकाँ अमोल युवराज भोसले, पोकॉ रविंद्र निंबा बच्छे, पोकॉ संदिप बाळासाहेब पाटील, पोकॉ. नंदकिशोर शिवराम महाजन, पोकॉ आशुतोष दिलीप सोनवणे, पोकॉ नरेंद्र किशोर चौधरी सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टे. तसेच फोटोग्राफर गोपाल विठ्ठल चितोडकर, वजन माप करणारे श्री निलेश सोमनाथ सराफ, रा. सराफ बाजार, चाळीसगांव यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक, सुहास आव्हाड व पोकॉ/उज्वलकुमार म्हस्के नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: