ग्रामविकास विभागाविरुद्ध कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अपील दाखल-गौतम कांबळे

Read Time4 Minute, 34 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्षांकडे अपील दाखल करण्यात आले आहे .याविषयी सविस्तरपणे बोलताना कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की,अवर सचिव वळवी, उपसचिव हंजे व कावरे या ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती शिक्षक महासंघास ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली . त्याबद्दल संघटनेच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले .34 गावातील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न,जिल्हा परिषद पुणे यांच्याकडील 2012 पासून रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती व प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली .महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांची भेट घेऊन मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली .नैमित्तिक रजा देताना राज्य सरकारने केलेल्या भेदभावाविरुद्ध आयोगाकडे अपील दाखल करण्यात आले .15 दिवसांत महाराष्ट्र शासनाकडून या विषयाची सर्व माहिती घेऊन पुढील सुनावणी ठेवण्यात येईल असे आश्वासन अध्यक्ष यांनी दिले .सुरेश माने (वकील मुंबई हायकोर्ट) यांची भेट घेऊन शिक्षक प्रश्नांवर न्यायालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन घेण्यात आले .सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांचे कार्य-निष्पादन अधिकारी यांची भेट घेऊन राज्यातील मूकबधिर व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत व तेथे कार्यरत असणार्‍या शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली .येत्या पंधरा दिवसात याबाबतचे आदेश सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांना देण्यात येतील असे त्यांनी सांगितले .राज्यपाल भवनचे संपर्क अधिकारी यांची भेट घेऊन राज्य सरकार शिक्षक संघटनाबाबत करत असलेल्या भेदभावाची माहिती देण्यात आली . चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .
दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांची भेट घेऊन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात आकाशवाणी आमदार निवास येथे चर्चा केली .या सर्व प्रश्नांची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना देण्याचे तसेच या प्रश्नांवर तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचे अश्वासन त्यांनी कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले . यावेळी राज्याध्यक्ष गौतम कांबळे , राज्यकार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे ,जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण ,खेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंणगारे,सोमनाथ पोळ,श्रीकांत पालवे सर ,प्रशांत आंधळे सर हे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली .

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post महिला दिनी मान्यवर महिलांची वेशभूषा साकारत अस्सलाम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी करून दिली त्यांच्या कार्याची ओळख
Next post अखिल भारतीय वारकरी महामंडळावर ह.भ.प. ए. बी.पाटील महाराज यांची निवड
error: Content is protected !!
%d bloggers like this: