Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

अखिल भारतीय वारकरी महामंडळावर ह.भ.प. ए. बी.पाटील महाराज यांची निवड

0
2 0
Read Time2 Minute, 24 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगाव(प्रतिनिधी):- चाळीसगाव येथील पाटील वाड्यातील वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ प्रचारक ह.भ.प. ए. बी. पाटील महाराज यांची अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या राज्य कार्यकारणीत राज्य सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे उद्देश, रचना व कार्यपद्धती मान्य असल्याने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नियमावलीचे पालन करून मंडळामध्ये कार्य करण्याची त्यांनी इच्छा दर्शविल्याने त्यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड ही खान्देश विभागाचे अध्यक्ष यांच्या शिफारशीने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांच्या संमतीने मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांनी ह.भ. प. ए. बी. पाटील यांची अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या राज्य सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे, तसे नियुक्तीचे प्रमाणपत्र नाशिक विभागाचे अध्यक्ष ह. भ. प. भाऊराज महाराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. चाळीसगाव येथे सुरू असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या अखंड हरीनाम सप्ताहच्या कीर्तनात नियुतीचे प्रमाणपत्र देऊन ए बी पाटील यांना गौरविण्यात आले. त्यांचा या निवडीबद्दल त्यांचे वारकरी संप्रदायात सर्वत्र अभिनंदन केले जात आह. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बंडू पगार, रामभाऊ गायकवाड, तात्या चौधरी, बाबा कवडे, बारकू महाराज, सि. ए. नाना, गिरीश देशमुख, आदी वारकरी संप्रदायातील बंधू उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: