अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक
वाघळी(चाळीसगाव)-आज दि 15 सप्टेंबर 2020 मंगळवार रोजी वाघळी येथील मुख्य रस्त्यावर उभे राहून मास्क न लावणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली,चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दंडात्मक कारवाई करण्यास सुरु केले आहे लोकांना जागृत करण्यासाठी शासनाने अनेक प्रयत्न केले शासन नियम सांगितले आहे तरी लोक नियम पाळतांना दिसत नाही नियम हे जनतेच्या हिताचे असले तरी जनता जर या शासन नियमांकडे दुर्लक्ष करत असतील तर शासनास पुन्हा कठोर पाऊल उचलावे लागतील महाराष्ट्र सरकार ने माझे कुटूंब माझी जबाबदारी ह्या उपक्रमाची सुरवात केली आहे शासन आपल्या परीने कार्य करत आहे जनते कडून फक्त सहकार्याची अपेक्षा असतांना जनता शासन नियम तोडतांनी दिसत आहे अश्या शासन नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर चाळीसगाव तालुक्यात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे, कारवाईचा भाग म्हणून आज वाघळी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली यावेळी वाघळी ग्रामपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते तसेच ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल युवराज नाईक,दिलीप रोकडे,रवींद्र बत्तीसे,नितेश पाटील,पोलीस कॉन्स्टेबल नंदू परदेशी,गोकुळ सोनवणे यांनी दंडात्मक कारवाई केली.
