अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)- दि 26 रोजी स्व. लाजवंती भावनदास गॕरेला माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, भिमनगर, दौंड. या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये चांद्रयान ३ ही मोहिम इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संघटना) यशस्वी पार करुन आपला भारत देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचविला त्याबद्दल संघटनेच्या सर्व शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभिनंदन कार्यक्रमप्रसंगी स्व. लाजवंती भा. गॕरेला माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब वागसकर व नवयुग प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदिप मांडे यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तद्नंतर विद्यालयातील इयत्ता पाचवी व सहावी या वर्गातीला विद्यार्थ्यांनी आपल्या संचलनाद्वारे भारतमातेस सलामी दिली. त्यानंतर “हम होंगे कामयाब” या गिताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या गीतासाठी श्री. संजय पवार व श्री. नवनाथ खंदारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी चांद्रयान ३ या उपग्रहाच्या यशस्वी चंद्रावरील अवतरणाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील सहशिक्षक श्री. संजय हरिभक्त व श्री. दादा क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतातून चांद्रयान ३ संदर्भात माहिती दिली. विज्ञान शिक्षक श्री. नितीन लोदाडे यांनी प्रश्नमंजूषा हा स्पर्धात्मक कार्यक्रम घेतला. या स्पर्धेमध्ये इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी लहानगटात तर मोठ्यागटात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब वागसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन आपण हे यश विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे प्राप्त करु शकलो हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. आणि विदयालयात अशा या कार्यक्रमाबाबत नवयुग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. गुरुमुख (दादा) नारंग यांची आपणांस नेहमीच प्रेरणा असते असा उल्लेखही केला. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. विजय वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले. वंदे मातरम् या गीत गायनाने कार्यक्रमाचा सांगता करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. संजय खामकर यांनी केले.