चाळीसगावाच्या विकासासाठी “मैं रुकेंगा नहीं” माजी आमदार राजीव देशमुख

0 0
Read Time3 Minute, 6 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगाव(प्रतिनिधी)- मणक्याची शस्रक्रिया झाल्यामुळे काही लोकांना वाटतंय मी थांबलोय,पण चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी मी थांबणार नाही अशी प्रतिक्रिया चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार
राजीव देशमुख यांनी शरद संवाद कार्यक्रमात बोलतांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर शरद संवाद कार्यक्रम सुरु आहे.
याच निमित्ताने मंगळवारी दि 8 फेब्रुवारी 2022 रोजी चाळीसगाव शहरात राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद संवाद कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमात माजी आमदार राजीव देशमुख यांनी विरोधकांचा पुष्पा स्टाईलने समाचार घेतला, त्यांनी एक प्रकारे विरोधकांना इशाराच
देऊन टाकला. ते म्हणाले की सद्या पुष्पा सिनेमातील डायलॉग“मै झूकुंगा नही,असाच माझा पण चाळीसगावाच्या विकासासाठी ” चालीसगाव के विकास के लिये मै रुकुंगा नही”,हा डायलॉग नसून निश्चय आहे,आपल्या मिश्किल शैलीत राजीव देशमुख यांनी पुष्पा सिनेमाचा डायलॉग मारल्याने कार्यक्रमात एकच हास्य पाहायला मिळाले सोबतच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला, येणाऱ्या काळात मीच विधानसभेचा उमेदवार असणार हे राजीव देशमुख हेच असणार असे चित्र निर्माण झाले आहे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली भाजपा सत्तेचा दुरुपयोग कश्या प्रकारे करत आहे, हेही मेहबूब शेख यांनी सांगितले .शरद संवाद कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाअध्यक्ष रवींद्र पाटील, प्रवक्ता योगेश देसले, माजी आमदार राजीव देशमुख ललित बागुल, प्रमोद पाटील, किसनराव जोर्वेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.