
चाळीसगावात शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांचा निषेधार्थ निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह

राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी या खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या उच्याराला आक्षेप घेतल्याच्या निषेधार्थ चाळीसगावात शिवसेनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयात तहसीलदार राहुल मोरे यांना निवेदन देऊन निषेध केला आहे दिनांक २३ रोजी राज्यसभेत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली शपथ संपल्यानंतर जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी असा छत्रपती शिवाजी महाराज व जन्मभूमी महाराष्ट्र विषयी आदरयुक्त उल्लेख केल्याने यास राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी हे माझे चेंबर असून याठिकाणी अशा पद्धतीचे स्लोगन उच्यारणे योग्य नाही असे बोलून आक्षेप घेतल्याने सर्वत्र महाराष्ट्रभर याचा निषेध होत असून छत्रपती शिवरायांचा उल्लेख करणे हे राज्यसभेत चालत नसेल तर हा शिवरायांचा अपमान आहे ही भावना समस्त शिवप्रेमी शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली असून भारतीय जनता पार्टीला छत्रपती शिवरायांबद्दल किती आकस आहे हे यावरून दिसून येत आहे व्यंकय्या नायडू यांनी याबाबत त्वरित माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे
यावेळी उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील,जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील ,तालुका प्रमुख रमेश चव्हाण ,तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे ,विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड ,माजी नगरसेवक संजय ठाकरे ,उपशहर प्रमूख शैलेंद्र सातपुते ,दिनेश विसपुते,चेतन कुमावत आदी उपस्थित होते
Related
More Stories
काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी,बियाणे, खते व किटकनाशके नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव-दि. 26जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते...
जलतरण तलाव सुरू करा आप ची फेसबुक लाईव्ह द्वारे मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात एकच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव तो पण बंद जलतरण प्रेमी नाराज,आम...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
Average Rating