चाळीसगाव आगारातील 09 वाहकांची यशस्वी घोडदौड……

0 0
Read Time3 Minute, 25 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगाव दि.23:- राज्य परिवहन चाळीसगाव आगारात वाहतूक नियंत्रक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 09 कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू असून संपकाळात राज्य परिवहन चाळीसगाव आगारात हजर झालेल्या वाहक पदावरील कर्मचाऱ्यांची खाते अंतर्गत वाहतूक नियंत्रकाची बढती परीक्षा घेण्यात आली होती.
वाहतूक नियंत्रकाच्या परीक्षेत चाळीसगाव आगारातील 9 कर्मचारी उत्तीर्ण झाले असून त्यांची वाहतूक नियंत्रक पदी बढती होणार आहे. उत्तीर्ण झालेले वाहक कर्मचारी
किशोर कुमावत,दीपक भोई, फरिद मुल्ला, उदय सोनवणे , शफी शहा, किशोर राजपूत,हेमराज जाधव, विनोद देशमुख,सईद शेख यांचे आगार व्यवस्थापक संदीप निकम यांच्या हस्ते श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सत्कारार्थी वाहकांचे प्रतिनिधी किशोर कुमावत यांनी नवीन पदाच्या जबाबदाऱ्या वाढल्या असून चांगले काम करून चाळीसगाव आगाराचे नावलौकिक वाढविण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप निकम यांनी सर्व वाहकांचे अभिनंदन करून सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर,यंत्र अभियंता श्रावण सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, कामगार अधिकारी राहुल शिरसाठ, कर्म-वर्ग अधिकारी प्रशांत महाजन यांनी उत्तीर्ण वाहक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक किशोर मगरे, कार्यशाळा अधीक्षक मनोज भोई,पाळी प्रमुख आनंदा साळुंखे, वाहतूक नियंत्रक शांताराम पाटील, किरण काकडे, लक्ष्मीकांत बोरसे, भाऊसाहेब हडपे, सुरेश गायकवाड, दीपक जाधव,सुनिल ठाकरे, संजय जाधव, किशोर नागरे, अनिल जाधव,अरूण वाणी अंबादास जाधव, आशा निकम,दामू जाधव,जगदीश पाटील नयना देवरे, मंगला पाटील,संगीता देवकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब हडपे यांनी तर आभार किशोर मगरे यांनी व्यक्त केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.