Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई,1 गावठी पिस्तुल 3 जिवंत काडतुस सह आरोपी ताब्यात

0
1 0
Read Time2 Minute, 47 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)-तालुक्यातील वाघळी गावात तरुण बेकायदेशीर गावठी पिस्तुल बाळगून असल्याची माहिती 4 एप्रिल 2022 रोजी ग्रामीण पोलिसांना मिळाली माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी आरोपीस सापळा रचून वाघळी येथून अटक केली आहे.

आरोपीजवळ सापडलेले पिस्तुल व काडतुस

वाघळी गावात बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्तूल स्वतः जवळ बाळगल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पवार यांनी पोना गोवर्धन बोरसे, पोना नितीन आमोदकर,पोना शांताराम पवार, पोहेकॉ दत्तात्रय महाजन,पोना जयंत सपकाळे यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले सदर पथकाने वाघळी गावात जुन्या चांभार्डी रोडलगत बेघर वस्तीमध्ये जाऊन आरोपी नामे आकाश अमृत शिरसाठ (वय २८) रा. वाघळी ता.चाळीसगाव यास अटक केली,त्याच्या जवळ गावटी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतूस असे एकूण २६ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे,पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश चव्हाण, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोउनि
लोकेश पवार, पोना गोवर्धन बोरसे, पोना नितीन आमोदकर, पोना शांताराम पवार,पोहेकॉ दत्तात्रय महाजन, पोना जयंत सपकाळे अशांनी केली आहे. पोना जयंत सपकाळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात
आले आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या
निर्देशानुसार पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण व पोना शांताराम पवार हे करीत आहेत.


Happy
Happy
0 %
Sad
Sad
50 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
50 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: