चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडून गुटख्यासह एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

0 0
Read Time2 Minute, 42 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

महिन्याभरात गुटख्याची दुसरी मोठी कारवाई

चाळीसगाव(प्रतिनिधी): चाळीसगाव ग्रामीण पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी मालेगाव रोडवर गस्त घालत असताना चाळीसगावकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरला थांबवले असता तो न थांबल्यामुळे त्याचा पाठलाग केला सदरील ट्रक मालेगाव जवळील मुंबई आग्रा हायवेवर (चाळीसगाव चौफुलीवर) थांबवला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली कंटेनरला कुलुप असल्याने पोलिसांनी कारवाईसाठी त्याला चाळीसगाव ग्रामीण पोलिसात आणले असता त्या कंटेनर मधून ८२ लाखाचा गुटखा मिळून आला.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, चाळीसगाव ग्रामीण पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी मालेगाव रोडवरील बेलगंगेजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर क्रमांक एचआर ३८ एबी ६०९६ संशयित वाटल्याने पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग केला असता कंटेनर चालक थांबला न्हवता पोलिस कंटेनरच्या मागावर होते पोलिसांनी सदरील कंटेनर मुंबई आग्रा हायवेवर मालेगाव जवळील (चाळीसगाव चौफुलीवर) पकडून त्यास विचारपूस केली असता त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून पोलिसांना संशय आल्याने ग्रामीण पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कंटेनर चाळीसगाव ग्रामीण पोलिसात आणून पंचांच्या समक्ष उघडून तपासणी केली असता सदरील कंटेनरमध्ये १३०प्लास्टिकच्या गोण्यामध्ये ८२ लाख २५ हजार १०० रुपयाचा 5k नामक गुटका मिळून आला व कंटेनर २० लाख रुपयाचा असा एकूण १,०२,२५,१०० रुपयांचा मुद्देमाल चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. कंटेनर चालकास ताब्यात घेण्यात आले असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार हे करीत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.