Read Time1 Minute, 22 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव-आज 15 ऑगस्ट 2020 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक स्वर्गीय शहिद गोपाल विठ्ठल भोई यांचे स्मृतिप्रीत्यर्थ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व दृष्टी फाऊंडेशन चाळीसगाव यांचे तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,

यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजय कुमार व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मयूर भामरे यांच्या सह 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरात एकूण 75 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले आहे.सदर शिबिरात महिलांची उपस्थिती देखील उल्लेखनीय होती. तसेच कधीही कोणत्याही गरजुला रक्त पाहिजे असल्यास संपर्क करण्याचे आवाहन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, दृष्टी फौंडेशन व लाइफ सेव्हर ग्रुप यांच्यातर्फे करण्यात आले आहे.