अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी)- जनांदोलन खान्देश विभागाने 3 फेब्रुवारी 2022 रोजी रेल्वेमंत्री यांना एक निवेदनाद्वारे रेल्वे पास सुरू करण्याची मागणी केली होती या मागणीला यश आले असून रेल्वे पास सुविधा सुरू करण्यात आली आहे.
कोरोणा काळात जन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रेल्वे सेवादेखील बंद करण्यात आली होती,आता काही महिन्यांपूर्वी रेल्वे सेवा सुरू झाली मात्र अपडाऊन करणारे प्रवासी,शासकीय व निमशासकीय कर्मचारी वर्ग यांना होणारी गैर सोय थांबविण्यासाठी रेल्वे पास सेवा सुरू करणे खूप गरजेचे होते मात्र रेल्वेची पास सेवा सुरू करण्यात आलेली नव्हती.
यासंदर्भात जनांदोलन खान्देश विभागातर्फे रेल्वेमंत्री यांना रेल्वे पास सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती या मागणीला यश आले असून रेल्वे पास सुविधा सुरू करण्यात आली आहे,अप डाऊन करणाऱ्या प्रवाश्यांचे हाल पाहता जनहितार्थ निवेदन देण्यात आले होते.
निवेदनावर प्राचार्य गौतम निकम, शत्रुघन नेतकर, विजय मदन लाल शर्मा,योगेश्वर राठोड,सुखदेव पंडित गुजर,नासिर भाई शेख, मिलिंद अशोक भालेराव,गणेश भोई,प्रदीप भीमराव चौधरी, अशोक राठोड,आर के माळी सर, सागर नागणे,संदीप पाटील आदींच्या सह्या होत्या