जमिया इस्लामीया विद्यापिठात CAB NRC बिलाविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीचार्ज,गोळीबार विरोधात शैक्षणिक बंद

2 0
Read Time2 Minute, 31 Second

औरंगाबाद(प्रतिनिधी):दि.१८ डिसेंबर २०१९ रोजी १२ वाजता विद्यापीठाच्या मुख्य कमानी समोर निदर्शने

जमिया इस्लामीया विद्यापीठ येथे CAB व NRC बिलाविरोधात प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल व विद्यापीठ परिसरात घुसून दिल्ली पोलीसांनी गोळीबार करत लाठीचार्ज करून शेकडो विद्यार्थ्यांना गंभीर जखमी केले त्यात काही विद्यार्थी मृत्युमुखी पडले असल्याने हा प्रकार संविधानिक अधिकारांचा उल्लंघन करणारा असल्याने या विरोधात सर्व परिवर्तन व संविधानवादी विद्यार्थी संघटनांनी दि.१८ डिसेंबर रोजी शैक्षणिक बंद ची हाक देत सरकारी दडपशाही विरोधात रणशिंग फुंकले आहे.
या बंद मध्ये एम आय एम विद्यार्थी आघाडीसम्यक विद्यार्थी आंदोलन,रिपब्लिकन विद्यार्थी सेना, एमआयएम विद्यार्थी आघाडी,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, ऐसेफाय,एनएसयुआय,एआयएसएफ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,सत्यशोधक विद्यार्थी संघटना,स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन, टिपू सुलतान सेना, समता विदयार्थी आघाडी,पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया,आजाद युवा ब्रिगेड,एसडी पीआय,मुस्लिम युथ फोरम, आदी संघटना सहभागी होणार आहे.

बंद मध्ये सहभागी होण्यासाठी डॉ.कुणाल खरात,प्रा.प्रकाश इंगळे,सचिन निकम,निलेश आंबेवाडीकर, गुणरत्न सोनवणे,अमोल दांडगे,लोकेश कांबळे,नितीन वाहूळे,अमोल खरात,ऍड अतुल कांबळे,अमोल घुगे,पवन साळवे,महेंद्र तांबे,भीमराव वाघमारे,राहुल खंदारे,अनिल दिपके,गुरू कांबळे,स्वप्नील गायकवाड, राजू पठाण,रहमान आलम खान,असद पटेल,मुबिन अन्सारी,शाफिक पटेल आदींनी आवाहन केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: