जालना येथील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील शिरसगाव येथे दिलीप पाटील यांचे आमरण उपोषण

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या १२ दिवसापासून आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राज्यात ठिकठिकाणी मोर्च निघून आरक्षणाची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जारंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला पाठीबा देण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील दिलीप फकिरा पाटील हे देखील मंगळवार दि. १२ सप्टेंबर पासून शिरसगाव येथील भवानी मंदिराच्या परिसरात आमरण उपोषणास बसणार आहेत.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देवून सरसकट ओ बी सी तुन आरक्षण सरकारने द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १२ दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. शासनाने दखल घेऊन त्वरीत न्याय द्यावा यासाठी व श्री. जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी दिलीप पाटील हे शिरसगाव येथेच भवानी मंदिराच्या परिसरात आमरण उपोषणास बसणार असल्याचे दिलीप पाटील यांनी तहसीलदार व मेहुणबारे पोलीसात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणी साठी गेल्या १२ दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील शिरसगाव येथे दिलीप पाटील हे आमरण उपोषणास बसणार असून तालुक्यातील मराठा समाजाने शिरसगाव येथे मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देवून मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मराठा कार्यकर्ते गणेश पवार यांनी केले आहे.