जि . प . 20 टक्के निधीतील कामे व खर्चाची माहिती द्या .गौतम कांबळेराज्याध्यक्षमहाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
पुणे(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडील जी .प .20 टक्के निधीतून केलेल्या विकास कामाची व खर्चाची माहिती द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी केली आहे
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने सन 2018 /19 ते 22 /23 या आर्थिक वर्षात 20 टक्के जिल्हा परिषद निधीतून केलेल्या विकास कामाची माहिती मिळावी तसेच कोणत्या कामावर किती खर्च केला याची माहिती मिळावी ही विनंती .समाज कल्याण विभागाच्या कामात अनेक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी संघटनेकडे आलेल्या आहेत .त्या तक्रारींची वस्तुस्थिती लक्षात घेऊन वरिष्ठांकडे योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे .तरी वरील विषयानुसार आपणाकडे मागितलेली माहिती संघटनेला तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .या मागण्याचे निवेदन मा .आयुक्त ,समाज कल्याण आयुक्तालय , महाराष्ट्र राज्य , पुणे
मा .उपायुक्त ,समाज कल्याण विभाग , समाज कल्याण आयुक्तालय ,पुणे
मा .प्रादेशिक उपायुक्त , समाज कल्याण विभाग , येरवडा पुणे
मा .मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद पुणे
मा .अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद पुणे
या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे .