अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी)-चाळीसगाव शहरातील मतदान याद्यांची फेरतपासणी करून प्रत्येक वार्डाचे सर्वेक्षण करून जे नागरिक ज्या वार्डात राहत असतील त्या वार्डात मतदान यादीत नाव टाकन्यात यावे.
ज्या वार्डात राहत आहे त्या वार्डात मतदान यादीत नाव नसल्याने व दुसऱ्या वार्डात नाव गेल्याने मतदार मतदान टाकण्यास टाळतात यामुळे मतदानाच्या टक्केवारीत घट होत आहे तरी सर्व मतदारांचा नवीन सर्व्हे करून जे मतदार ज्या प्रभागात राहत आहे त्यांचे नाव त्यांच्या प्रभागात समाविष्ट करण्यात यावे असे निवेदन चाळीसगाव प्रांत अधिकारी लक्ष्मण साताळकर यांना AIMIM चाळीसगाव च्या वतीने देण्यात आले यावेळी AIMIM चे शहर अध्यक्ष मुख्तार कुरेशी, सलमान खान आरिफ़ शाह ,कलीम शेख, सरफराज मनियार ,शकील मनियार आदी उपस्थित होते.
