दौंड(पवन साळवे) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला व वेळोवेळी पोलीस प्रशासन डॉक्टर व अन्य सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असताना मध्येच काही मोकाट फिरणारे तळीरामांचा सुळसुळाट सुरू असताना .आज अश्या तळीरामांना चांगलाच चाप देण्यात आला. पोलिस प्रशासन भर उन्हात जनतेच्या सेवेसाठी ताटकळत असताना व सर्व गोष्टींना समोरे जात असताना दौंड शहरातील काही मोकाट फिरणारे टवाळखोर हॉस्पिटल, किरणांचे कारणे सांगून बिनकामचे फिरत आहे व कोरोना नावाच्या विषाणूंला आमंत्रण देत आहे.अश्या या मोकाट फिरणाऱ्या टवाळ खोरांना दौंड शहर पोलिसांनी चांगलाच चाप दिला आहे अश्याच काही टवाळ खोरांनी शासन नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कलम 188 नुसार 12 मोटार सायकल जप्त करून दौंड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दौंडमध्ये बिनकामचे फिरणाऱ्या टवाळ खोरांची गय केली जाणार नाही असेच या करवाईतून दिसत आहे शहरातील मुख्य ठिकाणी स्वतः IPS ऐश्वर्या शर्मा मॅडम(उपविभागीय अधिकारी दौंड) यांनी सर्व मोटार सायकलवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहे.आदेशानुसार पो.ना रोटे. पो.शि,कडाळे, पो शी.अक्षय घोडके,पो कॉ अमजद शेख, चालक -पप्पू ओहोळ. पो. ना.भरत जाधव.पो.शी.खरात यांनी कारवाई केली
Read Time2 Minute, 11 Second