Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

टीईटी घोटाळा चाळीसगांव कनेक्शन,यादीत शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलाचे देखील नाव

0
1 0
Read Time2 Minute, 49 Second

संपादक गफ्फार मलिक(शेख)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगांव(प्रतिनिधी)-राज्यभर गाजलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार करून पात्र झालेल्या उमेदवारांमध्ये चाळीसगांव येथील सुद्धा उमेदवारांचा समाविष्ट त्यात शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलाचा देखील सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अन्य उमेदवारांप्रमाणेच शहरातील शिक्षकांवर कारवाई करीत त्यांची टीईटी प्रमाणपत्र रद्द केले आहे. दरम्यान,पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या पथकाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरोग्य विभाग, म्हाडा व टिईटी परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आणले होते. त्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१९ मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणही उघडकीस आले होते. सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टीईटीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांची पडताळणी केली होती. त्यामध्ये अपात्र असूनही पात्र ठरलेल्या सात हजार ८८० उमेदवार अपात्र ठरले आहेत. उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांचे टीईटी प्रमाणपत्र रद्द करून त्यांना यापुढे ‘टिईटी’ परीक्षेला बसण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली आहे. अशा उमेदवारांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यात
शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलाचे नाव असल्याचे उघडकीस आले आहे,एका संस्थेमध्ये तो शिक्षक असून गैरप्रकार करणाऱ्यांच्या यादीमध्ये त्याचे देखील नाव समाविष्ट आहे,बोगस प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षक बनून जवळपास 3 वर्षांपासून असे नामधारी शिक्षक शासनाकडून दरमहा पगार घेत शासनाची फसवणूक करीत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: