अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात टी एच आर प्रकरणी अधिकार आमचा च्या टीम ने केले स्टिंग ऑपरेशन हिरापूर रोड वरील 145 नंबरच्या अंगणवाडी मध्ये रेशनची टेक होम रेशनची (टी.एच.आर/सुगडी) पाकिटे वाटपात गोंधळ आढळून आले असून यामुळे बालगोपाळांच्या खाऊ वर पुरावठेदाराचा डल्ला तर मारत नाही ना असा संशय निर्माण होतो.
तीन वर्षांखालील वयोगटासाठी टेक होम रेशनची टेक होम रेशनची (टी.एच.आर/सुगडी)पाकिटे दिली जातात.ती पालकांनी घरी नेऊन रोज थोडी थोडी शिजवून बालकाला भरवावे अशी अपेक्षा असते मात्र शहरात हिरापूर रोड वरील काही टेक होम रेशनची लाभार्थ्यांच्या पालकांनी आमच्या टीम शी संपर्क साधत अंगणवाडी क्रमांक 145 व 107 येथे टेक होम रेशनची (टी.एच.आर/सुगडी) पाकिटे मिळत नसल्याच्या तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारी वरून टीम अधिकार आमचा ने प्रत्यक्ष अंगणवाडी क्रमांक 145 येथे जात अंगणवाडी सेविकांशी चर्चा केली असता पुरावठेदारा कडून मे व जून महिन्याचा टेक होम रेशनची (टी.एच.आर/सुगडी) पुरवठा झाला नसल्याची कबुली दिली त्यावरून लक्षात येते की नेमकं बालगोपाळांच्या खाऊ वर पुरवठादार डल्ला तर मारत नाही ना पुरवठा वेळोवेळी होत नसल्याच्या देखील तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत ,पुरवठादारास नेमकं पाठीशी कोण घालत आहे?सुपर वाईजर नेमकं काय लक्ष देत आहे? पुरवठादार अंगणवाडी सेविका प्रमानिक पणे आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असून पुरवठादार आपल्या नात्यातील राजकीय पुढारी असलेल्या व्यक्तीच्या नावाने दमबाजी करत आपले वजन तयार करून, तोंड दाबी करण्याच्या प्रयत्न केला जात असल्याची देखील चर्चा शहरात रंगली आहे, उपआयुक्त नाशिक यांना तक्रार दिली आहे,कारवाई चे आश्वासन मिळाले असून शासन नियमांनुसार चौकशी करत पुरावठेदारावर उपआयुक्त काय कारवाई करतात याकडे लाभार्थ्यांच्या पालकांचे लक्ष लागून आहे.