मुंबई(महाराष्ट्रा): दि १५ बुधवार रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची उंची १०० फूट वाढविण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे ,पाहिले स्मारकात उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची उंची २५० फूट होती ती आता ३५० फूट करण्यात आली आहे आणि खुर्ची ची उंची १०० फूट म्हणजे संपूर्ण पुतळ्याची उंची ४५० फूट असणार आहे,स्मारक उभारणीसाठी संपूर्ण खर्च ११०० करोड येणार आहे,यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले की स्मारकाचे काम २ वर्षात पूर्ण करणार.