अधिकार आमचा न्यूज पोर्टल
रोहित शिंदे उपसंपादक
चाळीसगाव येथील प्रसिद्ध डॉ शैलेंद्र अजयसिंग राऊळ व सामाजिक कार्यकर्ते नगर पालिका आरोग्य सभापती सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने व तहसीलदार प्रवीण मोरे यांच्या सहकार्याने परिसरातील पोलीस,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व आरोग्यासाठी मोफत सल्ला देण्यात आला
सद्या देशभरात कोरोनामुळे पोलीस प्रशासनाला खूप धावपळ करावी लागत आहे तसेच पत्रकार सुद्धा क्षणा क्षणाची अपडेट देत आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते सुद्धा खांद्याला खांदा लावून सहकार्य करत आहे या धावपळी मुळे पोलीस,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर ताण वाढून आरोग्याच्या समस्या चा सामना करावा लागू शकतो त्याच्या आरोग्याची काळजी म्हणून सर्व आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली जवळ पास 100 च्या वर पोलीस,पत्रकार व सामाजीक कार्यकर्ते यांची तपासणी करून आरोग्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले सर्व पोलिस व पत्रकारांनी दर राऊळ व सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव यांचे आभार व्यक्त केले तसेच अजय प्रतापसिंह पाटील,सायली जाधव,रोशन जाधव,तहसील कार्यालयाचे प्रवीण मोरे,गौतम जाधव,मुराद पटेल पत्रकार,बबलू जाधव,अभय राजपूत,किरण महाजन,किरण मोरे,शरद मोरे,लंकेश शर्मा,अक्षय जाधव,सना खान यांचे सहकार्य लाभले.
