संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
सिकलसेल आजार हा एक अनुवांशिक रक्त आजार आहे ज्यामुळे लाल रक्तपेशी अर्धचंद्राच्या आकाराच्या होतात. हे रक्तपेशी ऑक्सिजन योग्यरित्या वाहून नेण्यास सक्षम नसतात, ज्यामुळे वेदना, थकवा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.सिकलसेल आजारावर कोणताही इलाज नाही, परंतु उपचारांमुळे लक्षणे व्यवस्थापित करण्यास आणि रुग्णांना निरोगी जीवन जगण्यास मदत होऊ शकते.
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील देवळी गावात दि २९ जून रोजी नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,देवळी मधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी गावातील आदिवासी वस्ती आणि देवळी मध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी आयोजित केली.
या प्रभातफेरीमध्ये देवळी गावाचे सरपंच श्री अरुण गायकवाड, प्राथमिक मुख्याध्यापक श्री तुषार खैरनार, माध्यमिक मुख्याध्यापक श्री सतीश पाटील आणि शिक्षक-विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रभातफेरीचा समारोप ग्रामपंचायत कार्यालय देवळी येथे झाला. यावेळी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना सिकलसेल आजाराविषयी माहिती देण्यात आली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र देवळी मधील वैद्यकीय अधिकारी श्री बाळकृष्ण सूर्यवंशी यांनी सिकलसेल आजाराची लक्षणे, उपचार आणि घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.
श्री जितेंद्र सूर्यवंशी यांनी प्रस्तावना केली.या प्रभातफेरी आयोजित करण्यासाठी श्री सचिन पाटील, स्वप्निल पाटील, पंकज पाटील, शरद सूर्यवंशी, अमोल पगारे आणि इतर शिक्षकांनी कष्ट घेतले.या
प्रभातफेरीचे आयोजन देवळी मधील लोकांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी करण्यात आली होती आणि जनजागृती होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
