दौंडमध्ये माऊली शेळके मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांना मास्क व सँनेटायझर वाटप
दौंड(प्रतिनिधी):-आज दि 21 कोरोना व्हायरस च्या या विळख्यातून आम्हाला मुक्त करण्यासाठी अहोरात्र झटणारे तसेच स्वतःची पर्वा न करणारे पोलीस प्रशासन व आम्हाला गैर सोय होऊ नये म्हणून आमच्या साठी कार्य करणारे महसुल विभाग, राष्ट्रीयकृत बँक,सहकारी बँक या सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयीन अधिकार्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर आज दौंडमध्ये माऊली शेळके मित्र मंडळ यांच्या वतीने दौंड पोलिस स्टेशन, महसुल विभाग, राष्ट्रीयकृत बँक,सहकारी बँक या सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयीन अधिकार्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून व त्यांच्या आरोग्यास धोका उदभवू नये यासाठी मास्क आणि सँनेटायझर वाटप करण्यात आले व प्रामुख्याने कोरोना व्हायरस वर जनजागृती करण्यात आली.