दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत(दौंड) यांच्या वतीने औषध फवारणी

Read Time2 Minute, 28 Second

दौंड-(हर्षल पाटोळे) दि-२४/०३/२०२० रोजी सायं ५ वाजता दौंड तालुक्यातील लिंगाळी ग्रामपंचायत(दौंड) यांच्या वतीने औषध फवारणी ,जगामध्ये थैमान माजवलेल्या कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता याची राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायतही कोरोनाशी लढण्यास सज्ज झाली आहे.स्वच्छतेला प्राधान्य देत आहे गावातून जंतुनाशक फवारणी मोहीम हाती घेतली आहे याचाच एक भाग म्हणून लिंगाळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच-सौ.सुनिता येडे,उपसरपंच-श्री:गणेश जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य-नितीन चितारे,ग्रामविकास अधिकारी-मच्छिंद्र निगडे, कर्मचारी-श्री:सतीश चिकने, सामाजिक कार्यकर्ते-विकास शेलार,आदी कार्यकर्ते व तसेच लिंगाळी ग्रामपंचायत अंतर्गत चारही गावचे पोलीस पाटील उपस्थित होते. त्यांनी म्हटले आहे की लिंगाळी ग्रामपंचायतीचा विस्तार पुणे जिल्ह्यामध्ये मोठी ग्रामपंचायत म्हणून घोषित आहे.तरी आज रोजी जगदाळे वस्ती,शाहू नगर,वेताळ नगर,सध्या औषध फवारणी करण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे.परंतु राहिलेले गावे लिंगाळी मसनरवाडी, माळवाडी, मेरगळवाडी, येडेवाडी,जगताप मळा, मेरगळ मळा, विटकर वस्ती,पासलकर वस्ती,पद्मावती नगर,बालाजी नगर,पाटील वस्ती,मोरे वस्ती,आदी वाड्यावस्तीवर व जास्त लोक वस्ती असणाऱ्या ठिकाणी औषध फवारणी येत्या दोन दिवसात केले जाईल असे चारही गावच्या पोलिस पाटील यांनी आश्वासन दिले.यावेळी आठवडे बाजार बंद ठेवणे ग्रामस्थांना मार्गदर्शन म्हणून जनजागृती करणे घराघरातून कोरोना व्हायरसबाबत कशाप्रकारे काळजी घेण्यात यावर माहिती देण्यात आली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post वर्दीतील दर्दीमाणुस चाळीसगाव चे A P I मयूर भामरे साहेब
Next post करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन कराव पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
error: Content is protected !!
%d bloggers like this: