दौंड तालुक्यात चोरून वाळू उपसा करणा-या माफीयांनवर मोठी कारवाई,90 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट….

3 0
Read Time3 Minute, 23 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-काल दिनांक २४/०३/२०२१ रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे प्रोबेशनरी पोलीस उपधिक्षक श्री.मयुर भुजबळ साो,तसेच पोलीस कॉन्सटेबल किरण लालासो ढुके विशाल जावळे वाय.एस. कर्चे डी.व्ही.ढोले असे हजर असताना प्रोबेशनरी पोलीस उप अधीक्षक श्री.मयुर भुजबळ साो,यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे शिरापूर गावचे हद्दीतील भिमा नदीचे पात्रात तसेच हिंगणी बेरडी ता.दौँड जि.पुणे येथील भिमा नदी पात्रात इसम नामे बाबू मोरे रा.शिरापूर ता.दौँड जि.पुणे व गोकर्ण खेडकर रा.शिरापूर ता.दौँड जि.पुणे व इतर चार इसम हे अवैदय रित्या यांत्रिक बोटीचे सहाय्यांने विनापरवाना वाळू उपसा करून वाळू चोरी करीत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्या नंतर सदर ठिकाणी कारवाई करण्याकामी दौंड तहसिल कार्यालयातील दादा संभाजी लोणकर सर्कल देऊळगावराजे,दुशांत हरी पाटील तलाठी शिरापूर,विनोद मोहनदास बोकडे तालाठी हिंगणी बेरडी यांना दौंड पोलीस स्टेशन येथे बोलावून घेवून त्यांना वरील बातमीची माहीती देवून बातमी मिळाले ठिकाणी वरील स्टाफ शिरापूर गावचे हृद्दीतील भिमा नदीचेपात्रात तसेच हिंगणी बेरडी ता.दौंड जि.पुणे येथील भिमा नदी पात्रात या दोन ठिकाणी छापा घातला असता सदर ठिकाणी एकुण ९०,००,०००/-रूपये ( नव्वद लाख रूपये )किंमतीच्या वाळू उपसा करण्या करीता वापरल्या जाणा-या यात्रीकी फायबर बोटी मिळून आल्या त्या जागीच महसूल कर्मचारी यांचे मदतीने जिलेटीन च्या सहय्यांने स्फोट घडवून नष्ट करून टाकल्या असून सदर इसमांनवर भा.दं.वि.कलम ३७९,४३९,३४ सह गौणखनिज अधिनियम कलम ४,२१, पर्यावरण सरंक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९,१५ वसार्वजनीक मालमत्ता विद्वुपीकरण कलम ४ प्रमाणे कायदेशिर गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ पोलीस निरीक्षक नारायण पवार पोलीस अंमलदार विशाल जावळे किरण डुके यांनी केली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.