अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
दौंड:आज दि 20 दौंड येथील भाजी मंडई मासे मार्केट दौंड पोलिस तर्फे मटका अड्ड्यावर धाड टाकण्यात आली आरोपी १)अन्सार नजीर सय्यद रा.भाजी मंडई, मासे मार्केट.दौंड.जि.पुणे.याला ताब्यात घेण्यात आले असून 1700 रुपये मुद्देमाल व मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून.पो.ना.एस.बी.डोईफोडे यांनी फिर्याद दिली आहे.कोव्हीड-१९ संसर्ग होऊ नये म्हणुन जिल्हाधिकारी यांनी जमाव बंदीचे आदेश काढण्यात आले असून तरी अवैद्यरीत्या मटका जुगार चालवत असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.व महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ),भा.द.वी कलम १८८,२६९,२७० साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २,३,४,कोव्हीड-१९ उपाययोजना कलम ११ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब)नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. डी.वाय.एस.पी.ऐश्वर्या शर्मा.यांच्या मार्गदर्शनाखाली व पो.निरीक्षक श्री:सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली व पोलिस उपनिरीक्षक श्री:नितीन मोहिते यांच्या उपस्थितीत.पो.कॉ. गाढवे,पो.कॉ.गवळी,पो.कॉ.काळे यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पो.सुळ हे करीत आहे अशी माहिती ठाणे अंमलदार पो.ना.धनंजय दाभाडे यांनी दिली.