Read Time1 Minute, 15 Second
अधिकार आमचा न्यूज नेेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऊसतोड कामगारांची संख्या कमी झाल्यामुळे ऊस तोडणी लांब जाऊ नये म्हणून दिं. 01/10/2020 रोजी.दौंड मध्ये ऊस तोडणी यंत्र (शुगर केन हार्वेस्टर) व त्यासोबत सहा हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर नवीन आणले आहेत अशी माहिती श्री विठ्ठल गोरख जगदाळे यांनी दिली या यंत्रणा चे उद्घाटन श्री वीरधवल बाबा जगदाळे (चेअरमन दौंड शुगर) यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गायकवाड साहेब एम डी,काकडे साहेब शेती अधिकारी न्यू हॉलांड कंपनीचे नितीन घोडे, सागर कदम,नितिन पाटील, ऑपरेटर विजय वत्रे उपस्थित होते या मशिनद्वारे एका दिवसात दीडशे ते पावणे दोनशे टन ऊस तोडला जाणार आहे यामध्ये वेळेचीही बचत होणार आहे
Post Views: 1,090