
दौंड मध्ये लिंगाळी गावाच्या जवळ काळे मळा येथे फोटोग्राफर व्यवसायिक यांच्या डोक्यात दगड घालून अज्ञात व्यक्तीने केली हत्या
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-शहरातील प्रसिद्ध फोटो ग्राफर पिंटू उर्फ केदार भागवत यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.दौंड तालुक्यातील लिंगाळी गावच्या हद्दीतील केनोल शेजारी पिंटू उर्फ केदार भागवत वय 46 यांची हत्या झाली असल्याचे दौंड पोलीस स्टेशन येथे कळवले,त्यानुसार दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर याना घटनेची माहिती देऊन तातडीने घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता सदर व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचे दिसले,त्याठिकाणी हत्या करण्यासाठी वापरलेला दगड आणि दारूच्या बाटल्या मयताच्या शेजारी पडल्या होत्या,कोणत्यातरी कारणावरून अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे,या हत्येमुळे दौंड शहरात खळबळ उडाली आहे,तर्क वितर्क करत चर्चेला उधाण आले आहे, परंतू पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी हत्येचा तपास सर्व शक्यता पडताळून केला जाणार आहे जनतेने अफवा पसरवू नये,तसेच पोलीस लवकरच हत्येचे कारण आणि आरोपी शोधून काढतील तेव्हा अशावेळी संयम राखणे आवश्यक आहे असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक ऋषीकेश अधिकारी,पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे,ASI दिलीप भाकरे,पो ना धनंजय दाभाडे, धनंजय गाढवे,सचिन बोराडे,अमोल गवळी नारायण वलेकर घटनास्थळी दाखल होते. सदर माहिती हाती आली तेव्हा अज्ञात मारेकर्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे सुरू होते.पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक करीत आहेत.
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating