Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड येथील सुमारे २ महिन्यापूर्वीचा खुनाचा गुन्हा उघडकीस : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कामागिरी

0
1 0
Read Time4 Minute, 51 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-३/१०/२०२० रोजी सायं ०७.०० वा. ते ४/१०/२०२० रोजी सकाळी ०९.३० वाजण्याच्या दरम्यान मौजे लिंगाळी ता.दौंड गावच्या हद्दीत खडकवासला उपफाटा बंद कॅनलवर मोरीजवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून यातील (मयत) केदार उर्फ पिंटू श्रीपाद भागवत वय ४५ रा.शालीमार चौक दौंड ता.दौंड जि.पुणे याचे डोक्यात दारूची बाटली मारून व दगडाने टाकुन खुन केलेला होता. गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या बातमीनुसार जबरी चोरीचे गुन्हयातील माल विकणेसाठी आलेले आरोपी नामे १.ओमकार उर्फ काका महेंद्र गावडे वय २१ वर्षे रा.बेटवाडी, होलेमळा ता.दौंड जि.पुणे २.राजेश संभाजी बिबे वय १९ वर्षे रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे मूळ रा.माळेवाडी ता.जि.बिड ३.अजय ज्ञानेश्वर पवार वय १९ वर्षे रा.लोणीकाळभोर, एचपी गेटसमोर ता.हवेली जि.पुणे मूळ रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे ४.विशाल दिलीप आटोळे वय २४ वर्षे रा.गोपाळवाडी , गोकुळनगर ता.दौंड जि.पुणे या चौघांना ताब्यात घेवून त्यांचेकडून १ पल्सर मोटरसायकल, चोरीच्या २ सोन्याच्या अंगठ्या, ८ मोबाईल व रोख रक्कम असा किं.रु. २,२६,२७०/- चा माल हस्तगत केलेला होता. चौकशीत आरोपींकडून दौंड पो.स्टे. चे लिप्ट देण्याचे बहाण्याने लुटमार केल्याचे २ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले होते.
दौंड पो.स्टे.चे हद्दीत दोन महिन्यापूर्वीचे उघडकीस न आलेल्या वरील खुनाचे गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरील आरोपी चेक करून त्यांचे कडे सदर खुनाचे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी करीत असता स्थानिक गुन्हे शाखेच्या दौंड भागातील खबऱ्याने सदरचा खून सध्या जबरी चोरीत अटक असलेल्या आरोपींनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्या मार्फत मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यातील आरोपी नामे –
१) राजेश संभाजी बिबे वय १९ वर्षे रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे मूळ रा . माळेवाडी ता.जि.बिड
२) अजय ज्ञानेश्वर पवार वय १९ वर्षे रा.लोणीकाळभोर, एचपी गेटसमोर ता.हवेली जि.पुणे मूळ रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे या दोघांनी मिळून रेल्वेस्टेशनचे जवळून दौंडमध्ये राहणा-या एका व्यक्तीस सदर गुन्हयाचे घटनास्थळी नेवून चोरीचे उद्देशाने त्याची पॅट काढून त्यास दगडाने मारल्याचे सांगितले आहे. त्यावरुन सदरचा गुन्हा त्यांनीच केल्याचे निष्पन्न झालेले असून खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी श्री.राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, दौंड पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक नारायण पवार,
सहा.पो.नि. पृथ्वीराज ताटे,
पोहवा. महेश गायकवाड,
पोहवा. निलेश कदम,
पोहवा. सचिन गायकवाड,
पोना. गुरू गायकवाड,
पोना. सुभाष राऊत,
पोकॉ. दगडू विरकर यांनी केलेली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: