अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे.
दौंड:येथे अवैधरीत्या धंदे चालवणाऱ्याची गय नाही दौंडमध्ये अवैधरीत्या धंदे चालवणाऱ्या व सामाजिक भान नसणाऱ्या लोकांवर कडक आणि धडक कारवाईचे सत्र सुरू झाल्याने मटका व पत्याचे धंदे चालवणाऱ्याचे दाणे दणाणले आहे .कोव्हीड-१९ संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये व शासनाच्या आदेशाचा भंग केल्याने कारवाई करण्यात येत आहे.उपविभागीय अधिकारी अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उपविभागीय कार्यालय दौंड.श्री.नितीन मोहिते,पो.कॉ.शेख,पो.कॉ.वाघ,पो.कॉ.झाडबुके, पो.कॉ.घोडके, यांना सोबत घेऊन दौंड येथील बंगलासाईड येथील रेल्वे च्या बंद खोलीत पत्याचा क्लब सुरू असल्याची माहिती मिळताच तिथे दि 2 जून रोजी धाड टाकून पत्ते खेळणाऱ्या इसमाना ताब्यात घेऊन २२१७० रुपयेचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे कमलेश होले पो.ना यांनी फिर्याद दिली असून १)जेवीअर जॉन वय वर्ष-४० रा.रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ,२)विजय रामचंद्र होले वय वर्ष ५० रा.गोपाळवाडी,३)संजू जी फिलिप.वय वर्ष २७ रा.बंगलासाईड,४)रावसाहेब सुंदर शिंदे.वय वर्ष २७ रा.गोपाळवाडी,५)अस्लम चांद शेख. वय वर्ष ४१ रा.सरपंच वस्ती.६)विकास विजय शिंदे वय वर्ष २७ रा.गोपाळवाडी,७)सतिश वामन दरेकर वय वर्ष ४१ रा.गोपाळवाडी,८)दिगंबर लक्ष्मण वाघमोडे वय वर्ष ४० रा. सोनवडी.९)जॉन अँन्थोनी फिलिप. वय वर्ष ४९ रा बंगलासाईड.ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पो.सुळ यांनी दिली,पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.पांडुरंग थोरात हे करीत आहेत.