Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहर अवैध धंदे बंद मोहीम,15 दिवसापासून धडाकेबाज कारवाईचे सत्र सुरू

0
3 0
Read Time3 Minute, 11 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दौंड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदया विरूध्द विशेष मोहीम राबवून मागील १५ दिवसात पुढील प्रमाणे कारवाही करण्यात आली आहे.त्यामध्ये सुर्या लॉज येथे पीटा अँक्ट प्रमाणे कारवाई करून तेथून एका मुलीची सुटका केली आणि ३ आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. तसेच महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमानुसार एकुण ४ केसेस दाखल असून त्यामध्ये ११ आरोपींना अटक करून १७ हजार ८०५/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे.तसेच वाळूची एक कारवाई केली असून त्यामध्ये २ आरोपींवर गुन्हा दाखल करून ८ लाख रू चा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला आहे.दौंड पोलीस स्टेशन हद्दीत चोरून लपून अवैध दारू विक्रीचे वाढते प्रमाण लक्षात घेता दौड हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार एकुण १८ केसेसे दाखल केले असून त्यामध्ये २३ आरोपींना अटक करून ६ लाख ६२ हजार २४६ रू चा माल जप्त केला आहे.
सदरची कामगीरी ही मा.पोलीस अधिक्षक श्री.अभिनव देशमुख ,मा अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दौड विभाग दौड राहूल धस यांचे मार्गदर्शनाखाली दौंड चे पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार तसेच सपोनी अधिकारी ,पोसई.वाघमारे ,पोसईखरात ,पोसई लोंढे ,पोसई पालवे तसेच सहा फौजदार, भाकरे,सहा फौजदार गायकवाड,सहा.फौजदार शिंदे,सहा फौजदार जाधव,पोलीस हवालदार थोरात, पोलीस हवालदार गुपचे,पोलीस हवालदार चव्हाण,पोलीस हवालदार जाधव,पोलीस हवालदार गावडे,पोलीस हवालदार गायकवाड,पोलीस हवालदार राउत,पोलीस हवालदार गलगुंडे, पोलीस हवालदार होले, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार बंडगर यांनी केली आहे. जो पर्यंत अवैध धंदे बंद होत नाही अशीच कारवाही सुरू राहणार असून यापुढे कुठल्याही अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही असा इशारा दौड चे पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार यांनी दिला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: