धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?

1 0
Read Time3 Minute, 2 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध वैद्यकीय चाचण्या होणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे क्लीनिकल लॅब आणि पॅथॉलॉजिस्ट महत्त्वाचे ठरतात. आरोग्य व्यवस्थेतील इतक्या महत्त्वाच्या घटकाकडे मात्र आरोग्य यंत्रणा आणि संबंधित यंत्रणा गंभीर्याने पाहत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षांपासून शहरात बोगस क्लीनिकल लॅब आणि बोगस पॅथॉलॉजिस्टचा सुळसुळाट आहे.शहरात आजच्या घडीला अनेक बोगस क्लीनिकल लॅब्स कार्यरत आहेत. या बोगस लॅब आणि त्यातील बोगस पॅथॉलॉजिस्ट, बोगस तंत्रज्ञ वर्षानुवर्षे रुग्णांची आर्थिक लूट, फसवणूक करत असून त्यांच्या जीवाशी खेळ करत आहेत. या बोगस लॅबविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून आहेत. त्यामुळे अशा बोगस लोकांचे फावत असते मात्र जबाबदारी असलेल्या यंत्रणाने रुग्णांची आर्थिक लूट थांबवत काही अनर्थ होण्यापूर्वी कारवाई करावी अशी मागणी जागरूक नागरिक करीत आहेत.

लॅबसाठी ना नियम ना नोंदणी,सगळा आंधळा कारभार
ताप, सर्दी खोकला असो वा कर्करोगासारखे मोठे जीवघेणे आजार, अशावेळी अनेक प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या रुग्णांना कराव्या लागतात. रुग्णालयात क्लीनिकल लॅब असतात,तर इतर ठिकाणी लॅब असतात. फक्त लॅबमध्ये चाचणी करण्यासाठी तसेच चाचणी अहवालावर सही करण्यासाठी अधिकृत, नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट आवश्यक असतो. महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट असणे यासाठी बंधनकारक आहे. पण लॅबमध्ये नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट आहे की नाही हे तपासणारी यंत्रणाच शहरात कार्यान्वित नसल्याने. बोगस लॅब चालवणाऱ्यांचे फावत आहे. त्यामुळे शहरात बोगस लॅब आणि बोगस पॅथॉलॉजिस्टचा सुळसुळाट असल्याचे निदर्शनास येत आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.