नगरपालिकेची डास प्रतिबंधक फवारणी नुसती नावाला,डासांचा वाढता कहर आमच्या गावाला…..

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात डेंग्यू सदृश आजाराने डोकं वर काढताच खासदार उन्मेष पाटील यांनी नगरपालिका आरोग्य यंत्रणेला धारेवर धरले होते त्याचा इफेक्ट होऊन डास प्रतिबंधक फवारणी सुरू झाली पण ज्या प्रमाणात लाखोंचा खर्च कागदांवर दिसत आहे त्यानुसार डास प्रतिबंधक फवारणी होत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
डास प्रतिबंधक फवारणी सुरू झाली ती खासदार साहेब ॲक्शन मोडवर आल्यावर मात्र शहरात डासांची उत्पत्ती वर डास प्रतिबंधक फवारणीचा प्रभाव होतांनी दिसत नाही.खासदार साहेबांनी कानउघाडणी केल्यावर काही वार्डात तुरळक फवारणी झाली तर आजून काही वार्ड डास प्रतिबंधक फवारणी च्या प्रतीक्षेत आहेत.कागदावर दिसणारा महिन्याचा लाखोंचा खर्च आणि शहरात वाढत असलेले डासांचे प्रमाण यामुळे नगरपालिका आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा समोर आला असून नागरिकांची रात्रीची झोप अवघड झाली असून घराच्या बाहेर आवारात बसणे मुश्किल झाले आहे तरी वार्डातील नागरिकांच्या घनकचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीवर आलेल्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या सह्या दाखवत डास प्रतिबंधक फवारणी होत असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न नगरपालिका आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे.कोणते केमिकल डास प्रतिबंधक फवारणी साठी मंजूर आहे? कोणते केमिकल फवारणीसाठी वापरले जात आहे? खरोखर डास प्रतिबंधक फवारणी किती वार्डात झाली आहे व किती महिन्यानंतर? याची सखोल चौकशी करत मुख्याधिकारी यांनी लक्ष देत पाणी कुठं मुरतंय हे शोधून काढणे गरजेचे आहे.