नगरपालिकेने घरपट्टीची केलेली अन्यायकारक दरवाढ रद्द करण्यासाठी मा नगरसेवक भगवान अमरसिंग पाटील व मित्र मंडळाचे निवेदन

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात अनेक भागांमध्ये आज पर्यंत मूलभूत सुख सुविधा देखील पोहचल्या नाहीत त्यात नगरपालिकेने घरपट्टीची केलेली अन्यायकारक दरवाढ रद्द करण्यासाठी मा नगरसेवक भगवान अमरसिंग पाटील व मित्र मंडळाने निवेदन दिले.
यावेळी मा नगरसेवक पाटील यांनी ही घरपट्टी त केलेली दरवाढ ही जनसामान्यांचा विचार न करता मनमानी कारभार करत अन्यायकारक दरवाढ करण्यात आली आहे या दर वाढीमुळे शहरातून नाराजीचे सूर निघत असून त्वरित नागरिकांचा विचार करत लवकरात लवकर घरपट्टी कमी करून मूलभूत सुविधा मिळवण्यासाठीची मागणी केली अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा उचलण्यात येईल असे देखील सांगितले.नगरपालिका प्रशासनाने येत्या सभेत चर्चा करून यावर लवकरच तोडगा काडू असे आश्वासन दिले.निवेदनावर सर्व स्थानिक रहिवासी,मित्र मंडळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.