अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
शहर प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दि. १ मे स्व. लाजवंती भावनदास गॕरेला माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, भिमनगर, दौंड. या विद्यालयामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहन विद्यालयाचा माजी विद्यार्थी व पोलिस अधिक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण कनिष्ठ लिपिक मा. श्री. उदयसिंग साळवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नवयुग शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. गुरुमुख(दादा) नारंग हे उपस्थित होते. तसेच स्व.लाजवंती भावनदास गॕरेला माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, भिमनगर, दौंड. या विद्यालयाचे प्राचार्य श्री.बाळासाहेब वागसकर सर, नवयुग प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदिप मांडे सर,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका , वसतीगृह अधिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यालयाचे सह-शिक्षक श्री. संजय खामकर सर यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचे महत्त्व विद्यार्थांना सांगितले आणि उपस्थितांचे आभार मानले.