CAA कायद्याच्या विरोधात चाळीसगावात बंद ला अल्प प्रतिसाद,

Read Time2 Minute, 24 Second

चाळीसगाव (प्रतिनिधी)-दिनांक २४ जानेवारी २०२० शुक्रवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात महाराष्ट्र ’बंद’चे आवाहन केले होते. या बंदला चाळीसगाव येथे अल्प प्रतिसाद मिळाला बंद दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडला नाही. यावेळी तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले .  
    या बंदमध्ये अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. तसेच नोटबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे केंद्र सरकाविरोधात निषेधाचं वातावरण तयार झालं. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी बंदचे आवाहन केले होते. केंद्र सरकारने पारीत केलेल्या एनआरसी, सीएए व एनपीआर कायद्याच्या निषेधार्थ तसेच हा कायदा रद्द करावा अशा मागणीचे निवेदन वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. नायब तहसीलदार नानासाहेब आगळे व शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूर यांनी हे निवेदन स्वीकारले.यावेळी तालुकाध्यक्ष संभाअप्पा जाधव, महासचिव नितीन मरसाळे, शहराध्यक्ष स्वप्नील वैद्यकर यांच्यासह सतिष निकम, शाम जाधव, दीपक बागुल, आसीफ शेख, निवृत्ती बागुल उपस्थित होते. या बंद ला ऑल इंडिया मजलिस ए मुस्लीमीनच्या विद्यार्थी आघाडीनेही पाठींबा दिला. याबाबतचे निवेदन  नदीम शाकीर मन्सुरी, रेहान मासुम मन्सुरी, वसीम शेख सलीम, सलमान खान अय्युब खान यांनी दिले. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post पर्यावरण, आरोग्यासाठी एकवटले सायकलप्रेमी प्रदूषणमुक्त भारत’ संदेश देण्यासाठी सायकल प्रवासातून घातला जातोय आदर्श
Next post तांदुळवाडी तालुका भडगाव( वार्ताहार) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यानिमित्ताने लहान बालकांचा गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम अथवा वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते
error: Content is protected !!
%d bloggers like this: