अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
पाटस ता.दौंड -काल दि 14 रोजी पुणे ग्रामीण LCB टिमने पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या बातमीनुसार यवत पो.स्टे. हद्दीत पाटस उड्डान पुलाचे शेजारील सर्व्हीस रोडवर, बसस्टॉप समोर ता.दौंड जि.पुणे येथे आरोपी नामे १)लक्ष्मण उर्फ लखन दत्तात्रय सपकाळ वय ३५ रा.कानगाव, वरसगाव वस्ती, ता.दौंड जि.पुणे मूळ रा.वरसगाव गोरडवाडी ता.वेल्हा जि.पुणे याने विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव आरोपी २)दिपक उर्फ मोगल्या पासलकर (पूर्ण नाव माहित नाही) रा.कुरण बुाा ता.वेल्हा जि.पुणे याचेकडून विकत घेतलेले व स्वत:चे कब्जात बाळगलेले एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मोटरसायसकल, मोबाईलसह एकुण किं.रु. १,१८,६०० / – असा मिळून आला आहे. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी यवत पो.स्टे. चे ताब्यात दिलेले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली
सहा.पो.निरीक्षक पृथ्वीराज ताटे,
पोहवा. महेश गायकवाड,
पोहवा. निलेश कदम,
पोहवा. विदयाधर निचित,
पोहवा. सचिन गायकवाड,
पो.ना. गुरु गायकवाड
पो.ना. सुभाष राऊत यांनी केलेली आहे.