अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव-आपल्या कार्याने नेहमीच्या चर्चेत असणारे जळगांव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिवाळी निम्मित ट्विटर वर ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत पण विशेष म्हणजे आपल्या खान्देशी जनतेच्या भाषेत म्हणजेच अहिराणी मध्ये शुभेच्छा दिल्या आहेत काल संध्याकाळी ट्विटर वर
राम राम
दिवाईन्या तुमले सगळी मंडईले गहिऱ्या शुभेच्छा
तुमनं आयुष्य आसच चमकत रावो दिवाईनी लायटिंग सारखं
तुमनं तोंड आसच गोड राहो दिवाईनी सांजरीसारखं
परत एकदा आनंद मा जावो तुमनी दिवाई..
(आपुन दिवाई करानी आणि अहिराणीले अंधारामा ठेवानी?)
म्हणून हाई मुद्दाम “अहिराणीमा” शुभेच्छा.
या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत खान्देशी अहिराणी भाषेचा मान राखत व जनतेला आपल्या शैलीत खान्देशातील मातीत राहून दिल्लीत जरी असलो तरी खान्देशी मातीतला आहे हे खासदार पाटील यांनी सिद्ध केले आहे.
