अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी) – दि. ०८ सप्टेंबर २०२५
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पाळधी येथे अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पाळधी येथील शाम कॉलनीतील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोउपनि. शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. या कारवाईत १६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम ₹७,२२,२६० व ₹५,०२,००० किमतीचे मोबाईल फोन असा मिळून एकूण ₹१२,२४,२६० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. शरद बागल यांच्यासह पोलीस अंमलदार अक्रम शेख, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, नितीन बावीस्कर, सलीम तडवी, विनोद पाटील, विजय पाटील, रवींद्र चौधरी, रवींद्र कापडने, सिध्देश्वर डापकर, राहुल रगडे, रतन गिते, मयुर निकम, भारत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकुर (स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव) तसेच पाळधी दुरक्षेत्राचे सपोनि. प्रशांत कंडारे, अमोल धोबी व रवींद्र चौधरी यांनी संयुक्तरीत्या सहभाग नोंदविला.
