पिस्टल व जिवंत काडतुस बेकायदेशीरपणे बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट 2कडून अटक

1 0
Read Time4 Minute, 42 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

चिंचवड(पुणे)-गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
दिनांक ०४/०१/२०२१ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडून मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांचे आदेशाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अमरनाथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील आरोपी चेकींग करुन जबरी चोरीचे गुन्हयाना प्रतिबंध करण्याचे सत्र सुरू असताना गुन्हेगार चेकींगची व्यापक मोहीम राबविण्यात येत असुन पोलीस उप निरीक्षक एस डी निलपत्रेवार यांचे
समवेत तसेच सपोफौ केराप्पा माने, पोहवा शिवानंद स्वामी, जयवंत राऊत, पोना नामदेव राऊत, पोकॉ अजित सानप, आतिष कुडके, शिवाजी मुंढे, नामदेव कापसे असे निगडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस काँस्टेबल अजित सानप यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली कि, एक इसम नाव रविंद्र गणपत येवले रा.वाकसाई हा त्याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगुन तो गुरुव्दारा चौकाकडून आकुर्डी रेल्वे स्टेशन कडे येणाऱ्या रोडवर मोटर सायकलवरुन येणार असल्याची बातमी मिळाल्याने व आरोपी गुरुद्वारा चौकात दहशत माजविण्याच्या प्रयत्नात आहे अशी माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अमरनाथ वाघमोडे यांना बातमीची माहिती कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचूनआरोपी रविंद्र गणपत येवले वय २१ वर्षे, रा. वाकसाई पो.वेहेरेगाव ता. मावळ जि. पुणे यास बड्या शिताफीने अटक करण्यात आली त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस मिळुन आले. आरोपी रविंद्र गणपत येवले रा पुणे याचे विरुध्द निगडी पोलीस ठाणेकडे भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे पोकॉ नामदेव महादेव कापसे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला
शहरात गोळीबार या सारखे गंभिर गुन्हे घडत आहेत गेल्या काही महिन्यात अनेक ठिकाणी गोळीबार देखील झाले आहेत त्यातील कुख्यात आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखा युनिट 2 अहोरात्र करून गुन्हेगारांचा शोध घेत काही गुन्हेगारांना बेड्या देखील ठोकल्या आहेत व आज गुरुद्वारा चौकात अटक केलेल्या आरोपीला वेळीच गुन्हा करण्यापासून रोखल्याने पुढील होणाऱ्या घटने पासून नागरिकांना वाचीण्यात यश देखील मिळविले आहे या कारवाई मुळे जनतेत समाधानाचे वातावरण आहे आहे.सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री
आर आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट २ चे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस उप निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार केराप्पा माने, शिवानंद स्वामी, दिपक खरात, उषा दळे, जयवंत राऊत, विपुल जाधव, जमीर तांबोळी, नामदेव राऊत, अजित सानप, नामदेव कापसे, आतिष कुडके, शिवाजी मुंढे यांचे पथकाने केली आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.