Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पुणे,इंदोर विमानसेवा सुरु होण्यासाठी खासदारांनी कसली कंबर !

0
1 0
Read Time5 Minute, 25 Second

नागरी विमान उड्डाण मंत्री हरदिपसिंग पूरीजी यांची खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्लीत घेतली भेट

जळगाव विमानतळावरून लवकरच पुणे इंदोर विमानसेवेसाठी केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

जळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास आराखडा तयार केला असून येथुन लवकरच पुणे , इंदोर विमानसेवा सुरू करण्याबाबत खासदार उन्मेश पाटील यांनी कंबर कसली असून आज दिल्लीत मंत्री महोदयांची त्यानी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत नागरी विमान उड्डाण मंत्री हरदिपसिंग पूरीजी यांनी या नविन विमानसेवेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही नविन विमानसेवा लवकरच सूरू होणार आहे. आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्लीत नागरी विमान उड्डाण मंत्री हरदीप सिंग पूरी यांची भेट घेतली . यावेळी भारतीय विमान प्राधिकरण सहसचिव उषा पाडी, नियोजन सदस्य अनिल पाठक यांची उपस्थिती होती
जळगाव विमानतळावरून लवकरच पुणे, इंदोर विमानसेवा सुरू व्हावी यासाठी विविध अडथळे, विवीध प्रकारच्या अडचणी मार्गी लावण्याकरीता आज सायकाळी सहा वाजता खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ना हरदीप सिंग पूरी यांची भेट घेतली.सुमारे अर्धा तास ही बैठक चालली. दोनच दिवसांपूर्वी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव विमानतळ येथे विमानतळ बांधकाम विभागीय अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक यांच्या समवेत सल्लागार समितीची बैठक घेतली. आणि आज दिल्लीत केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ना. हरदीप सिंग पूरी यांची भेट घेऊन लवकरात लवकर जळगाव ते पुणे तसेच जळगाव ते इंदोर विमानसेवा सुरु करावी अशी आग्रही मागणी केली. मंत्री महोदयांच्या भेटी अगोदर खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नागरी विमान उड्डाण मंत्रालयाचे मुख्य सचिव प्रदीप सिंग खरोला यांची भेट घेतली. यानंतर केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ना. हरदीप सिंग पूरी यांची भेट घेतली. यावेळी पुणे विमानतळ हे संरक्षण विभागाच्या ताब्यात असून विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळावरून पुणे विमान सेवा सूरू करण्यासाठी पुणे येथे स्लॉट मिळावा याकरिता विशेष प्रस्ताव अर्थात स्पेशल केस म्हणुन स्लॉटची मान्यता प्राप्त करावी. तसेच इंडिगो आणि एअर अलायन्स खाजगी आणि सरकारी विमान कंपनी यांचेशी चर्चा करावी.अशा सूचना मंत्री महोदयांनी दिल्यात.सध्याच्या धावपट्टीचा विस्तार करून सतराशे वरून चौपन्नशे मीटर केल्यास येथे मोठे प्रवाशी विमानसेवा सुरु होईल. तसेच नवीन टर्मीनल बिल्डिंग सह कार्गो टर्मिनल बिल्डिंग, विमानासांठी स्वतंत्र पार्किंग आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी सूचना केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ना. हरदीप सिंग पूरी यांनी यावेळी दिल्या आहेत.

आज जळगाव विमानतळ येथून पुणे आणि इंदोर विमानसेवा सुरु करण्यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी त्यांची दिल्लीत भेट घेतली.

यावेळी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. याबाबत खुद्द मंत्री महोदयांनी ट्विट केल्याने सोशल मीडियावर या चर्चेचे जोरदार स्वागत करण्यात आले. जळगाव विमानतळ येथून सध्या मुंबई आणि अहमदाबाद विमानसेवा सुरू असून येत्या काळात पुणे आणि इंदोर विमानसेवा सुरू होणार असल्याने खान्देश वासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: