पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अजब कारभाराची मालिका सुरूच,माध्यमिक शिक्षण विभागानंतर आता प्राथमिक शिक्षण विभागाचा अजब कारभार .

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात राज्यकारभाराच्या गजब घटना घडत आहेत.माध्यमिक शिक्षण विभागानंतर आता प्राथमिक शिक्षण विभागाचा आजब कारभार पाहायला मिळाला आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांच्या अजब कारभाराची अनेक प्रकरण गाजत असतानाच प्राथमिक शिक्षण विभागानेही आम्ही कुठे कमी नसल्याचे दाखवून दिले आहे .जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना गोपाळकाल्याची सुट्टी देण्यात आलेली आहे .राज्य सरकारने तर मुंबई व नवी मुंबईतील सर्वच कार्यालयांना सुट्टी दिलेली आहे .परंतु पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मात्र दरवर्षी देण्यात येणारी गोपाळ काल्याची सुट्टीच रद्द केली आहे .यापूर्वीही रक्षाबंधनाची सुट्टी रद्द करण्यात आली होती परंतु संघटनेच्या प्रयत्नामुळे पुन्हा रक्षाबंधनाची सुट्टी देण्यात आली . प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्याकडे काही संघटनांनी सुट्टीची मागणी करूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले व मनमानी कारभाराची परंपरा सुरूच ठेवले आहे .घरातील किंवा शेजारील मोठ्या मुलांना सुट्टी असल्यास लहान मुले शाळेत जायचे टाळतात .त्यामुळे प्राथमिक शाळांमधील गैरहजेरीचे प्रमाण वाढते हे साधे मानसशास्त्र शिक्षण विभागाला माहीत नसावे याचे आश्चर्य पालकांमधून व्यक्त केले जात आहे .याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे .चौकशी करून ते योग्य निर्णय घेतील व शिक्षण विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करतील अशी अपेक्षा शिक्षकांमधून व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे .